दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय संकल्प दिवस ‘ आणि ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ साजरा
(भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन )
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभाग आणि कार्यालयाच्यावतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा 31ऑक्टोंबर हा स्मृतिदिन ‘ राष्ट्रीय संकल्प दिन ‘ व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31ऑक्टोंबर हा जन्मदिवस ‘ राष्ट्रीय एकता दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलूकर यांनी आयर्नलेडी इंदिरा गांधी व देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार यांच्यासमवेत सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,पोपट वाजपाई, गाडे,सचिन सूर्यवंशी,पाटील,केंद्रे आदिंसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.